लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
मुंबईसह महाराष्ट्र आणि देशभरातली भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक राजाच्या दर्शनाला येत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी लालबागच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही आज सपत्निक लालबागच्या राजाचे दर्शन घेतेल. अनेक सेलिबिटींनीही येथे हजेरी लावली.
लालबागच्या राजाला अंबानी कुटुंबाकडून यंदा सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. तर, देशभरातून येणाऱ्या भाविकांकडून श्रद्धेने दानपेटीला गुप्तदान दिलं जात आहे. काही भक्तांकडून मौल्यवान वस्तूही अर्पण केल्या जात आहेत.
पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या वस्तू व पैशांची मोजदाद सुरु झाली आहे. सर्वप्रथम लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजदाद केली जाते. त्यानंतर गणेशभक्तांनी सोने आणि चांदीचे दागिणे अर्पण केले आहे त्यांची मोजदात केली जाते.
लालबाग राज्याच्या चरणी दोन दिवसात 67 लाख दहा हजार रुपये दान देण्यात आलं आहे. ही रक्कम रोख स्वरुपात राजाचरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आली आहे. स्टेज पेटीतून 41,30,000 हजार रंगपेटीतून 25 लाख 80 हजार रुपयांची मोजदाद झाली आहे.
यासह मौल्यवान वस्तूंमध्ये सोन्याची दागिने 339.770 ग्रॅम एवढे अर्पण करण्यात आले असून चांदी 6,368 ग्राम
लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या या दान स्वरुपी नीधीचा उपयोग लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक सामाजिक उपक्रमांत वापरत असतात. त्यामुळे गणेशभक्तांनी दान केलेल्या या नीधीचा उपयोग गणेशभक्तांच्याच अत्यावश्यक सेवेसाठी वापरला जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बँक आणि जी एस महानगर बँकेचे कर्मचारी लालबागच्या राजाचरणी अर्पण झालेल्या दानाची मोजदाद करत आहेत.