Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात अशी घ्या चेहऱ्याची काळजी
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे त्वचा निस्तेज दिसू लागते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्द्रतेमुळे त्वचा चिकट होते. त्यामुळे अशा स्थितीत त्वचेची खासकरुन चेहऱ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
पंरतु या गोष्टीमुळे काळजी करण्याची गरज नाही. पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल सविस्तर जाणून घेऊया.
चेहरा वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावा. म्हणजे चेहऱ्यावरील साचलेला तेलकटपणा जाण्यास मदत होते.
पावसाळ्यात देखील सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरु शकते.
पावसाळ्यात दोन दिवसांनी एकदा चेहऱ्याला वाफ दिल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर होण्यास मदत होऊ शकते.
पावसाळ्यात मॉइश्चरायझरचा वापर करणे देखील फायदेशीर ठरु शकते.
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर चिकटपणा जाणवू लागतो आणि घाम येतो. त्यामुळे चेहरा पाण्याने धुवून स्वच्छ करावा.
पावसाळ्यात मेकअप करणे टाळावे. कारण या ऋतूमध्ये आर्द्रता जास्त असते आणि जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा तुम्हाला घाम येण्याची शक्यता असते.