Beauty Tips: पावसाळ्यात 'अशी' घ्या त्वचेची काळजी; त्वचा राहील नेहमी निरोगी
पावसाळ्याच्या दिवसात त्वचेच्या छिद्रांत घाण अडकणार नाही, याची काळजी घ्या. दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीराला विषारी पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, जेणेकरून मुरुम येणार नाहीत. पाण्याची कमतरता करु नका.
पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं असतं, त्यामुळे त्वचेला पोषण देण्यासाठी मॉइस्चराइरचा वापर करा.
त्वचेवर ग्रीन टी, लिंबू आणि काकडी यांसारखे नैसर्गिक टोनर वापरा. टोनिंगमुळे त्वचेतील घाण निघून जाईल आणि त्वचा कोरडीही होणार नाही.
पावसाळ्यात वातावरणात थंडावा वाढू लागताच तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करता. मात्र अति गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेचा मऊपणा कमी होतो आणि त्वचा कोरडी, रखरखीत होते. त्यामुळे पावसाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ करा.
पावसाळ्यात आठवड्यातून एकदा चेहऱ्याला स्क्रबिंग करावं, त्यामुळे चेहरा स्वच्छ राहतो.