Health News : अँटी-एजिंगपासून सुटका हवीय? आहारात 'या' पदार्थांचा समावेश केल्याने सुरकत्या कमी होतील
चेहऱ्याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी आजच तुमच्या आहारात बदल करा. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोग्य तज्ज्ञांच्या मते, अँटी-एजिंग खाद्यपदार्थ खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन आणि चेहरा चमकदार होतो. (Image Source : istock)
पपई अँटीऑक्सिडेंट फूड आहे, यामध्ये खनिजे देखील मुबलक प्रमाणात आढळतात. पपई खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील. (Image Source : istock)
कडधान्य खाण्याचे अनेक फायदे आहेत, यामुळे चेहऱ्यावरही चमक येते. प्रथिने, खनिजे, फायटोन्यूट्रिएंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबर यासारखे महत्त्वाचे पोषक घटक डाळींमध्ये आढळतात. (Image Source : istock)
कडधान्याचे सेवन केल्याने त्वचेच्या पेशी विकसित होतात आणि चेहरा चमकदार दिसू लागतो. (Image Source : istock)
एवोकॅडो या फळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियम सारखे पोषक असतात. (Image Source : istock)
एवोकॅडो खाल्ल्याने कोरडी त्वचा पुन्हा जिवंत होण्यास मदत होते. एवोकॅडो खाल्ल्याने मृत पेशी निघून जातात आणि चेहरा तरुण दिसू लागतो. (Image Source : istock)
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम आणि आयर्न सारखे पोषक घटक आढळतात. (Image Source : istock)
पालक खाल्ल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. (Image Source : istock)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image Source : istock)