PHOTO : काय सांगता! एकाच वेळी गावकऱ्यांनी केले चारशे कंटेनरचे लक्ष्मीपूजन
केज तालुक्यातील सांगवी (सारणी) गावातील तरुणांकडे एक, दोन नव्हे तर तब्बल 450 कंटेनर आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडमधील हे चित्र अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरत आहे.
दरम्यान, याच गावात दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी 250 कंटेनर उभे होते.
या कंटेनरची सामूहिक पूजा हभप अर्जुन महाराज लाड, हभप प्रकाश महाराज साठे, सरपंच संजय केदार आणि ज्येष्ठ नेते दत्ता धस यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आली.
तर, 150 कंटेनर माल वाहतुकीच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांत असल्यामुळे त्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे लक्ष्मीपूजन केले.
केज तालुक्यातील सांगवी (सारणी) हे गाव तसे अहमदपूर- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गालगत असलेले खेडेगाव आहे.
या गावची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या घरात असून मतदारांची संख्या 1350 इतकी आहे.
विशेष म्हणजे, 1995 ते 2000 दरम्यान गावातील काही तरुण विविध वाहनांवर क्लीनर म्हणून काम करीत होते.
यातूनच 2001 मध्ये गावातील 15 तरुण चालक बनले. नंतर कोणी स्वतःचे वाहन घेतले तर कोणी दुसऱ्याकडे चालक म्हणून काम केले.
छत्रपती संभाजीनगर येथील पुष्पक ट्रान्सपोर्टमध्ये बहुतेक जण चालक म्हणून कामाला लागले. त्यानंतर कष्टाच्या बळावर आपापली प्रगती साधू लागले.
आज याच गावातील तरुणांकडे तब्बल तब्बल 450 कंटेनर आहेत. ज्यातील दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी 250 कंटेनर गावात उभे होते.