Dengue-Malaria Home Remedy : पावसाळ्यात डेंग्यू-मलेरियापासून वाचण्यासाठी 'हे' सहा घरगुती उपाय करा
पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरिया वेगाने पसरतो. डासांमुळे वेगवेगळे आजार होतात. यापासून वाचण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही घरगुती उपाय देखील करु शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुळवेलीचा काढा : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असावी लागते. यामध्ये गुळवेल फायदेशीर ठरु शकते. ताप कमी करण्यासाठी तुम्ही गुळवेलीचा काढा पिऊ शकता. यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी, अँट पायरेटिक गुण असल्याने त्याचा काढा प्यायल्यास ताप कमी होतो.
कडुलिंबाची पाने : जर तुम्ही दररोज कडुलिंबाची पाने खात असाल तर ताप, मलेरिया, डेंग्यू सारखे आजार बरे होऊ शकतात. या पानांमध्ये जिवाणू आणि विषाणू मारण्याची क्षमता असते.
तुळशीच्या पानांचा रस : तुळशीची पानं देखील फायदेशीर असतात. यामध्ये अँटी पायरेटिक आणि डायफोरेटिक गुण असतात. तुळशीची पानं खाल्ल्यामुळे घाम येऊन शरीराचं तापमान कमी होतो. ताप असताना तुळशीच्या पानांचा रस पिणं फायदेशीर ठरु शकतं.
दालचिनीचा काढ़ा: मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांसाठी दालचिनीचा काढा देखील फायदेशीर आहे. आयुर्वेदात हा काढा तापावरील सर्वात उत्म उपाय असल्याचं म्हटलं आहे. या काढ्याला चव यावी यासाठी त्यात मध देखील टाकू शकता.
आल्याचा रस : इराणी संशोधनानुसार, आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. आल्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवून इन्फेक्शन दूर होतं. ताप आल्यास आल्याचा रस पिणं लाभदायक ठरतं.
हळद दूध : जर तुमच्या घरात कोणाला ताप असेल तर तो कमी करण्यासाठी हळद दूध पिऊ शकतात. यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतं. शिवाय यामुळे वेदानांपासूनही आराम मिळतो.