Mumbai News: पाणी, रस्ते, नालेसफाईचा मुद्दा नाही मग जनआक्रोश मोर्चा कशासाठी? ठाकरे गटाने काढलेल्या मोर्चावर संतप्त नागरिकांचा सवाल
दरम्यान त्या मोर्चाबाबत ठाकरे गटाला सवाल करणारे बॅनर वांद्रे परिसरात लागले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई पालिका एच पूर्व विभागावर काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चा हा अनधिकृत शाखेसाठी आणि माजी नगरसेवक यांच्या अनाधिकृत बांधकामसाठी होता
पाणी, रस्ते, नालेसफाईचा मुद्दा मांडण्यात आला नाही.
त्यामुळे जनआक्रोश मोर्चा कशासाठी होता असा सवाल इथल्या नागरिकांनी केलाय.
काही दिवसांपूर्वी पाणी आणि इतर प्रश्नांवर ठाकरे गटाचा एच पूर्व मनपा कार्यालयावर मोर्चा निघाला होता.
त्या मोर्चाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रश्न विचारणारे बॅनर वांद्रे परिसरात सर्वत्र लागले आहेत.
संबंधित विभागत लोकप्रतिनिधींनी शिवालिक वेंचर पुनर्वसन प्रकल्प म्हणजेच सरकारी कर्मचारी असलेली शासकीय वसाहतीतील हक्काची घरे आणि बेहराम पाडा येथील चमडावाडी नाला प्रकल्पग्रस्तांना हक्काची घरे यासारख्या प्रश्नांसाठी कधी मोर्चाच काढला नाही.
त्यामुळे जनआक्रोश मोर्चा कशासाठी असा सवाल उपस्थित करणारा मथळा बॅनरवर आहे.हे बॅनर बेघर नागरिकांनी लावले असल्याचा त्यात उल्लेख आहे.