Rain: मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेसह रस्ते वाहतुकीवर परिणाम
मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पावासाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटांनी उशीराने सुरु आहे.
तर हार्बर मार्गावरील लोकल 15 मिनीटाने तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 मिनीट उशिराने सुरु आहे.
सध्या नवी मुंबई आणि पालघर परिसरात संपुर्ण ढगाळ वातावरण आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून पावसाची संततधार सुरुच असून काल दुपारनंतर हलका झालेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर पकडला आहे.
आज पहाटेपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. यामुळं सर्वच भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे
सकाळपासून मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूरपासून सायनपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यात काही रुग्णवाहिका देखील अडकल्या आहेत.
वाहतूक संथ गतीनं असल्यामुळं चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे.