Drink Herbal Tea For Immunity : हर्बल टी हिवाळ्यात आरोग्यासाठी गुणकारी; हर्बल टीच्या सेवनाने प्रतिकारशक्तीसह भरपूर ऊर्जा मिळते.
हिवाळा म्हणजे आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा ऋतू. या ऋतूत थंडी असते पण, थंडीपासून रक्षण करण्याचे बरेचसे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच उपलब्ध असतात. (Photo Credit :Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही थंडीत हर्बल टीचे सेवन करू शकतात. यामध्ये वापरलेले काही पदार्थ हे उष्ण असतात, त्यामुळे ते थंड वातावरणात घेणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. काही रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात तर काही खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. काही वजन कमी करतात तर काही ते पिऊन पोट साफ करतात.(Photo Credit :Pixabay)
अशाच काही हर्बल टीच्या रेसिपी जाणून घ्या ज्या तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या घटकांपासून तुम्ही बनवू शकता. (Photo Credit :Pixabay)
लेमनग्रास आणि आल्याचा चहा : यासाठी थोडे लेमनग्रास घ्या, आले ठेचून पाण्यात टाका आणि दोन्ही एकत्र उकळा. त्यात लवंगा टाका आणि थोडा वेळ उकळल्यानंतर गाळून प्या. (Photo Credit :Pixabay)
चव कडू वाटत असेल तर थोडा गूळ घाला. त्यामुळे हिवाळ्यात घशाला खूप आराम मिळण्यास मदत होते, आणि पोटासाठी देखील हे उत्तम मानले जाते. (Photo Credit :Pixabay)
मध, लिंबू आणि हळदीचा चहा : या चहाला हिवाळ्यातील अमृत असे म्हटले जाते. हा चहा बनवण्यासाठी, थोडी काळी मिरी बारीक करा आणि कच्च्या हळदीचे लहान तुकडे करा ते तुकडे पाण्यात उकळवा. पण कच्ची हळद गरम असल्याने टी कमी प्रमाणात घ्यावी. काही वेळाने ते गाळून त्यावर लिंबू आणि मध मिसळून प्यावे. हिवाळ्यात हा रामबाण उपाय म्हणून काम करतो.(Photo Credit :Pixabay)
तुळशीचा चहा : तुळशीच्या चहाचे फायदे अगणित आहेत. तुम्ही ते तुमच्या नेहमीच्या चहामध्ये मिसळून किंवा पाण्यात उकळून चहा म्हणून घेऊ शकता. हे केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर त्वचेसाठी देखील खूप चांगले आहे. तुळशीचा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात तुळशीची पाने उकळा आणि गाळून त्यात एक चमचा मध व लिंबाचा रस घालून प्यावे. (Photo Credit :Pixabay)
पुदिना चहा आणि दालचिनी चहा : दालचिनी इतकी गरम असते की, हिवाळ्यात ती घेणे चांगले. यासाठी पाण्यात दालचिनी उकळून त्यात ठेचलेली काळी मिरीही टाका. खाली उतरवून त्यात गूळ घालून प्यावे. (Photo Credit :Pixabay)
हा चहा वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर मानला जातो. त्याचप्रमाणे तुम्ही पुदिन्याचा चहा देखील पिऊ शकता. पुदिन्याचा चहा पोटासाठी चांगला असतो. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून गाळून घ्या, त्यात लिंबू आणि मध घालून तुम्ही पिऊ शकतात. (Photo Credit :Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit :Pixabay)