टॉनिक, गोळ्या खाणं सोडून द्या; आता फक्त 'हे' पदार्थ खा, कधीच कमी होणार नाही हिमोग्लोबिन!
आयर्नची कमतरता कामयची दूर करण्यासाठी उत्तम उपाय डाएट ठरतो. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही पदार्थांचा समावेश करून आहारातील आयर्नची कमतरता दूर करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयर्न म्हणजे, शरीरातील एक आवश्यक मिनरल. शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी आयर्न मदत करतं. लाल रक्तपेशींमध्ये असलेलं एक प्रोटीन जे फुफ्फुसातून शरीराच्या उर्वरित भागात ऑक्सिजन वाहून नेतं.
शरीरात मुबलक प्रमाणात आयर्न असल्यामुळे, ॲनिमियाचा धोका नसतो आणि संपूर्ण शरीरासाठी ते खूप फायदेशीर मानलं जातं. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, जे खाल्ल्यानं शरीरात आयर्नची कमतरता होत नाही.
image 10
डाळी - 100 ग्रॅम डाळींमध्ये 3.3 मिलीग्राम आयर्न आढळतं. प्लांट बेस्ड आयर्नचा हा सर्वोत्तम स्रोत आहे.
पालक - 100 ग्रॅम पालकमध्ये 2.7 मिलीग्राम आयर्न आढळतं. त्यात लोहाशिवाय व्हिटॅमिन ए, सी आणि के देखील असतात.
हरभरा - 100 ग्रॅम हरभऱ्यामध्ये 2.9 ग्रॅम लोह असते. त्यात लोहासोबतच फायबर आणि प्रथिनेही भरपूर असतात.
टोफू - 100 ग्रॅम टोफूमध्ये 5.4 ग्रॅम लोह आढळतं. जर तुम्ही विगन असाल तर टोफू हा आयर्नचा उत्तम स्रोत मानला जातो.
डार्क चॉकलेट - 100 ग्रॅम चॉकलेटमध्ये 11.9 मिलीग्राम लोह असते. खायला रुचकर असण्यासोबतच त्यात भरपूर आयर्न असते.
(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)