Eye Twitching : उजवा डोळा फडफडणं अशुभ की डावा डोळा? शास्त्र सांगते...
वास्तुनुसार तुमचा कोणता डोळा फडफडतो, यावरुन अनेक गोष्टींचे संकेत मिळतात. शास्त्रानुसार, डोळ्यांच्या फडफडण्यामागे शुभ किंवा अशुभ कारणं असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोळे फडफडणं ही वैज्ञानिकदृष्ट्या फार सामान्य बाब झालीये. परंतु, धार्मिकतेनुसार आजही काही गोष्टींना फार मानलं जातं. यानुसार, कोणता डोळा फडफडणं चांगलं? जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार पुरुषांसाठी उजव्या डोळ्याचं फडफडणं शुभ मानलं जातं. जर एखाद्या पुरुषाचा उजवा डोळा फडफडत असेल तर त्याला लवकरच चांगली बातमी मिळणार आहे, असं मानतात.
उजवा डोळा फडफडणं पुरुषांसाठी चांगलं असतं. अशा वेळी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो, एखाद्या कामात यश मिळू शकतं किंवा चांगल्या मित्राला भेटण्याची संधी मिळू शकते.
पुरुषांचा डावा डोळा फडफडणं अशुभ समजलं जातं. डावा डोळा फडफडल्यास अशुभ घटना घडतील, असं मानतात. यामुळे वाद, कामात अडथळे, कुटुंबात कलह, अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता असते.
स्त्रियांसाठी डाव्या डोळ्याचं फडफडणं शुभ असतं. जर एखादा स्त्रीचा डावा डोळा फडफडत असेल तर तिला चांगली बातमी मिळू शकते.
स्त्रियांसाठी डाव्या डोळ्याचं फडफडणं चांगलं आहे, या काळात तुमच्यासोबत चांगल्या घटना घडतात.
याउलट, उजवा डोळा फडफडणं हे स्त्रियांसाठी अशुभ मानलं जातं, या वेळी संकटाची चाहूल मिळत असते. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
परंतु वैज्ञानिकदृष्ट्या पाहिल्यास, थकवा, तणाव, कॅफिन किंवा अल्कोहोलचं अतिप्रमाणात सेवन यामुळे डोळे फडफडतात. असं वारंवार होत असतील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वारंवार डोळे फडफडत असतील तर पुरेशी झोप घ्या आणि तणाव टाळा.