Kojagiri Purnima 2024 : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नका 'या' चुका; लक्ष्मी होईल नाराज, होईल मोठी धनहानी
शरद पौर्णिमेच्या दिवशी नकारात्मक विचार मनात आणू नये, तुमचे विचार शुद्ध ठेवावे, तरच घरात पैसा टिकून राहतो, अन्यथा वर्षभर आर्थिक तंगीला सामोरं जावं लागतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोजागिरीच्या दिवशी घरात वादविवाद टाळावे, ही गोष्टी लक्ष्मीला आवडत नाही, यामुळे घरात पैसा टिकत नाही.
शरद पौर्णिमेच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावं, नाहीतर घरी आलेली लक्ष्मी आल्या पावली मागे फिरते.
शरद पौर्णिमेच्या दिवशी खोटं बोलू नये आणि कोणाचं वाईट चितवू नये, अन्यथा पापांत डबल वाढ होते आणि देवी लक्ष्मीचा कोप होतो.
शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नये, अन्यथा लक्ष्मीचा कोप होतो आणि वाईट घटना घडतात.
शरद पौर्णिमेच्या दिवशी पैशाचे व्यवहार चुकूनही करू नये, अन्यथा हातातील पैसा विनाकारण खर्च होतो.
कोजागिरी पौर्णिमेला कर्ज, उधार देणे टाळावे. या दिवशी कोणत्याही व्यक्तीला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होतो.
कोजागिरीच्या दिवशी काळा रंग वापरू नये, अन्यथा नकारात्मकता ओढावून आर्थिक संकटं चालून येतात.
शरद पौर्णिमेच्या दिवशी सवाशिनी महिला घरी आल्यास तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये, शक्य झाल्यास तिची ओटी भरावी. यामुळे घरात सुख-समृद्धी खेळती राहते.
कोजागिरी पौर्णिमेला मिठाचं आणि दह्याचं दान अजिबात करू नये, यामुळे जीवनात नकारातमकता वाढते आणि चौफेर अडचणी देखील वाढतात.