Stomach Growling : पोटात गुडगुड होतंय? वेळीच सावध व्हा अन् डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर...
ही समस्या काही काळासाठी असल्यास ही सामान्य बाब आहे, पण ही समस्या दीर्घकाळ असल्यास याकडे दुर्लक्ष करु नका.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाकडे दु्र्लक्ष करणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं. पोटात गुडगुड होण्याची समस्या दिर्घकाळ राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटात गुडगुड होण्याचा आवाज (Stomach Growling) काही आजारांचे संकेत असण्याची शक्यता आहे.
भूख लागणे : पोट रिकामे असल्यास आणि भूक लागली असल्यास पोटातून गुडगुडण्याचा आवाज येऊ शकतो. तुम्ही अन्न खाल्ल्यावर हा आवाज कमी होतो. त्यामुळे पोटात गुडगुड झाल्यावर खाल्लं पाहिजे.
घाईघाईत जेवणं, खूप जलद खाणं, आम्लयुक्त पदार्थ खाणं, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग (GERD) किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) यामुळे देखील पोटात गुडगुड होऊन अस्वस्थ वाटू शकतं.
ऍलर्जी : बर्याच वेळा जेव्हा आपण लैक्टोज किंवा ग्लूटेनन युक्त अन्न खातो तेव्हा त्यांच्या पचनामध्ये समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोटात गुडगुडण्याचा आवाज येऊ शकतो.
गॅस्ट्रोएन्टेरिटिस, पोट आणि आतड्यांमध्ये संसर्ग किंवा जळजळ झाल्यामुळेही पोटातून गुडगुड असा आवाज येऊ शकतो. याला स्टमक फ्लू (Stomach Flu) असंही म्हणतात. या समस्येमुळे जुलाब, उलट्या आणि पोटदुखीसारख्या समस्या होऊ शकतात
अन्न पचनादरम्यान आतड्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे पोटात गुडगुडण्याचा आवाज येतो. त्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा उलट्या यांसारखी लक्षणेही दिसू लागतात. असे झाल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अन्नपचनावेळी पोटातील हालचाली आणि क्रियांमुळे गुडगुड आवाज होणं सर्वसामान्य आहे. मात्र, ही समस्या दिर्घकाळ जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढेल आणि हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.