Health Care: जेवताना मोबाईल किंवा टीव्ही का पाहू नये? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
लहान मुलं असोत की वडीलधारी मंडळी, आजकाल बहुतेकांना जेवताना टीव्ही पाहण्याची, मोबाईल वापरण्याची सवय आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्याच्या युगात असं कोणीतरी क्वचितच सापडेल, जे मोबाईल आणि टीव्ही न पाहता जेवण करतात. पण जेवताना मोबाईल किंवा टीव्ही पाहिल्याने अनेक आजारांचा धोका आपोआप वाढतो, हे अनेकांना माहीत नसतं.
जेवताना टीव्ही किंवा मोबाईल पाहिल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जेवताना टीव्ही किंवा मोबाईल का वापरू नये? हे जाणून घेऊया.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टीव्ही पाहताना तुमचा वेळ काढण्यासाठी तुम्ही अनेकदा जास्त खाता, जे लठ्ठपणाचं सर्वात मोठं कारण ठरतं. जास्त खाल्ल्याने वजन वाढण्याचा आणि लठ्ठपणाचा धोका वाढतो.
जे लोक जेवताना टीव्ही आणि मोबाईल वापरतात त्यांना पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. पचनक्रिया बिघडण्याचीही शक्यता असते.
या चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला मधुमेह देखील होऊ शकतो आणि चयापचय मंद होऊ शकतं. एवढंच नाही तर हृदयविकार आणि उच्च रक्तदाबाची समस्याही उद्भवू शकते.
जेवताना टीव्ही आणि मोबाईल वापरणारे लोक नेहमी झोपेच्या कमतरतेचा सामना करताना दिसतात.