Health Tips : स्किझोफ्रेनिया म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या या आजाराची लक्षणं

स्किझोफ्रेनिया...एक विकार ज्यामुळे ग्रस्त व्यक्ती सर्वांबरोबर राहूनही वेगळ्या जगात राहतो. तो सगळ्यांपासून दूर राहतो, एकटाच बसतो आणि स्वतःशीच बोलत राहतो. ही एक प्रकारची मानसिक समस्या आहे. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. स्किझोफ्रेनिया म्हणजे काय, तो कसा होतो आणि त्याचे उपचार काय आहेत ते जाणून घेऊयात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
स्किझोफ्रेनिया हा असा आजार आहे ज्यामध्ये रुग्ण विचार न करता बोलू लागतो. तो प्रत्येक गोष्टीत गोंधळलेला असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्या मेंदूमध्ये डोपामाईन नावाचे न्यूरोट्रांसमीटर असते, जे मेंदू आणि शरीरात समन्वय साधते.

जेव्हा काही कारणास्तव मेंदूतील डोपामाइन रसायन जास्त प्रमाणात वाढते, तेव्हा स्किझोफ्रेनिया होतो. या आजाराची मुख्यतः दोन कारणे आहेत. पहिलं कारण - अनुवांशिक आणि दुसरं कारण - घर किंवा आसपासचे वातावरण. स्किझोफ्रेनियाला न्यूरोलॉजिकल कारणेही असू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
WHHO च्या मते, जगातील सुमारे 20 लाख लोक स्किझोफ्रेनियाने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर एखाद्याच्या वागण्यात काही बदल होत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.
स्किझोफ्रेनियाचे रुग्ण अस्तित्वात नसलेले आवाज ऐकतात. कोणीतरी आपल्या विरोधात कट रचत आहे असं त्यांना वाटतं. ते डॉक्टरांकडे जाण्याचे टाळतात. अशा परिस्थितीत आत्महत्येचे विचारही मनात येतात. ते कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
मँचेस्टर विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, स्किझोफ्रेनियामध्ये व्हिटॅमिन बी सप्लिमेंट्स फायदेशीर ठरू शकतात. व्हिटॅमिन B6, B8, B12 पूरक स्किझोफ्रेनियाच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात. या आजारावर औषधे, मानसशास्त्रीय सपोर्ट थेरपी आणि समुपदेशनानेही उपचार करता येतात.
डॉक्टरांच्या मते, सर्वात आधी रुग्णाच्या मानसिक तणावाचे कारण ओळखणं गरजेचं आहे. अशा वेळी रूग्णाला व्यायाम, ध्यान, योगासने, संतुलित आहारासाठी प्रवृत्त केले पाहिजे. अशा रुग्णांवर प्रेमाने उपचार करणं गरजेचं आहे. रूग्णांना त्यांच्या आवडत्या गोष्टी करून द्याव्यात.