PHOTO : जाणून घ्या जागतिक मृदा दिनाचे महत्त्व!
आज जागतिक मृदा दिन. प्रत्येक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो. मातीचे संवर्धन करणे हा या मागचा उद्देश आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमृदा संवर्धन संदर्भात जागरुकता करण्याच्या दृष्टीने 2013 साली सयुंक्त राष्ट्राच्या महासभेत 5 डिसेंबर हा जागतिक मृदा दिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) अर्थात अन्न आणि कृषी संघटनेच्या वतीनं या दिवसाचे आयोजन केले जाते.
नैसर्गिक संसाधनातील महत्वाचा घटक म्हणजे माती. चांगली माती असेल तेव्हाच चांगले अन्न मिळू शकते. मातीत असलेल्या पौष्टिक घटकातूनाच पिके, वृक्ष यांना पोषकता मिळत असते.
जमिनीच्या ऱ्हासाचा परिणाम म्हणून, जमिनीची उत्पादक शक्ती कमी होत आहे. परिणामी शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. आणि यामुळे चांगले अन्न मिळत नाही.
विविध प्रकारचा कचरा, घरगुती, सार्वजनिक, औद्योगिक, खनिज उत्खनन आणि कृषी कचरा इ. मेडिकल वेस्ट, प्लास्टिक, शेतातील रासायनिक खतांचा अतिवापर, कीटकनाशके फवारणी, जंगलतोड इ. आणि असंख्य प्रकारच्या टाकाऊ वस्तूंचे संकलनामुळे मृदा प्रदूषण होते.
सेंद्रिय खतांचा कमी वापर करुन जैविक खतांचा वापर वाढवावा वृक्ष लागवड जेणे करून मातीची धूप कमी होते.
मृदेची सुपीकता नष्ट होत चालली आहे. तीचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. देशातील बहुतांश लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे मानवाच्या अधिवासासाठी मातीचं आरोग्य जपत संवर्धन करणे आवश्यक आहे.