यशोगाथा! तीन एकरात तब्बल 24 लाख रुपयांच्या पेरूचं उत्पादन
वाघोली येथील राजेंद्र मगर शिक्षक म्हणून सेवा बजावतात. सुटीत ते शेतीत नवनवे प्रयोग करत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमगर यांनी अडीच वर्षापूर्वी मोहोळ येथील एका शेतकऱ्याकडे व्हीएनआर जातीच्या पेरूची बाग पाहिली. पेरू लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे पाहून त्यांनी रायपूर (छत्तीसगड) येथून दीड हजार रोपे आणले.
यावेळी त्यांनी तीन एकर शेतामध्ये 1475 रोपं लावली. यावेळी त्यांना एका रोपसाठी 200 रुपये खर्च आला.
ठिबकमधून प्रत्येक सात दिवसाला औषधी देण्यात आली. सोबतच झाडांवर फवारणी करण्यात आली. या सर्वांसाठी एक वेळापत्रक तयार करण्यात आला होता.
झाडांना लागणाऱ्या फळांचं वजन वाढल्यास ते वजन सहन करणार नाही म्हणून यासाठी लोखंडी पाईपलावून फाउंडेशन केले. यासाठी त्यांना 5 लाखांचा खर्च आला.
त्यानंतर मे 2023 मध्ये त्यांनी फळ लागवडीसाठी छाटणी केली आणि 15 ऑक्टोबरपासून फळधारणेला सुरुवात झाली.
ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत तीन एकरात 33 टन फळांतून 24 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.
मगर यांचे पेरू सांगली येथील व्यापाऱ्यामार्फत केरळच्या बाजारपेठेत विक्रीस गेले आहेत. व्यापाऱ्याकडून पेरूला 70 रुपये भाव मिळाला आहे.
पेरुचा बहार आता संपत आला असून, दोन ते तीन टनाचा माल झाडावरच आहे.
पेरूचे दर उतरल्याने 35 ते 40 रुपये भाव मिळत आहे. तो माल स्थानिक बाजारपेठेत विक्री केला जात असून, त्यातूनही जवळपास एक लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा मगर यांना आहे.