राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह निमित्ताने स्त्रियांच्या आरोग्यासंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी
महिला आणि मुलींना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह दरवर्षी मातृदिनाच्या दिवशी सुरु होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया वर्षी हा 8 मे ते 15 मे या कालावधीत साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह महिलांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. यावर्षी 21 वा राष्ट्रीय महिला आरोग्य सप्ताह साजरा करणार आहोत.
मजबूत हाडे, हृदयाची लय नियंत्रित करण्यासाठी तुमच्यामध्ये योग्य कॅल्शियम असणे गरजेचे आहे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे ऑटिओपोरोसिस होऊ शकतो. आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना याचा धोका जास्त असतो.
जास्त प्रमाणात कॅफिन हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे तुमचे निर्जलीकरण होते. आणि कॅल्शियम बाहेर पडून तुमच्या हाडांवर परिणाम होतो. यामुळे दिवसातून दोन कप कॉफी प्या.
व्हिटॅमिन बी एकंदर आरोग्यासाठी आवश्यक आहे. कारण त्यात फॉलिक अॅसिड किंवा फॉलेट असते. बाळंतपणाच्या वयातील प्रत्येक स्त्री साठी फॉलेटहे एक आवश्यक पोषक तत्व आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.