PHOTO: कंगनाच्या लूकने वेधलं लक्ष; फोटो होतायत व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या चित्रपटांसाठी चाहते नेहमीच आतुर असतात. पडद्यावर ती कोणत्याही प्रकारची भूमिका चांगल्या प्रकारे साकारू शकते हे कंगनाने प्रत्येक वेळी सिद्ध केले आहे.(photo:kanganaranaut/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॉमेडी असो किंवा अॅक्शन, कंगनाने कोणत्याही भूमिकेत कोणतीही कसर सोडली नाही. मात्र, वैयक्तिक आयुष्यातही ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. याशिवाय कंगनाच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. (photo:kanganaranaut/ig)
कंगना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिच्या फॉलोअर्सची यादीही मोठी होत आहे.(photo:kanganaranaut/ig)
आता पुन्हा कंगनाने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या अवतारात अभिनेत्री खूपच वेगळी आणि बोल्ड दिसत आहे. यादरम्यान तिने पांढऱ्या रंगाचा ऑफ-शोल्डर गाऊन कॅरी केला आहे.(photo:kanganaranaut/ig)
या गाऊनच्या स्लीव्हज खूप लक्ष वेधून घेत आहेत. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी कंगनाने तिच्या गळ्यात पांढऱ्या मोत्यांची माळ घातली आहे आणि कानात लहान झुमके घातले आहेत.(photo:kanganaranaut/ig)
कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिच्याकडे अनेक चित्रपट रांगेत आहेत. लवकरच ती 'धाकड' या चित्रपटात दिसणार आहे.(photo:kanganaranaut/ig)
यानंतर ती 'तेजस' आणि 'सीता: द इनकार्नेशन' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.(photo:kanganaranaut/ig)