Health Tips: एखाद्याचं उष्टं का खाऊ नये? जाणून घ्या...
एकमेकांसोबत जेवण शेअर करताना बहुदा एकमेकांचं उष्ट अन्न खातात. तुम्हीही जर एखाद्याचं उष्टं अन्न अगदी सहजपणे खात असाल तर तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउष्टं अन्न खाल्ल्याने अनेक प्रकारचे इन्फेक्शन आणि आजार होण्याचा धोका वाढतो. जेव्हा तुम्ही एखाद्याचं उष्टं अन्न खात असता, त्यावेळी तुम्ही बॅक्टेरिया शेअर करत असता.
असे अनेक लोक आहेत ज्यांना जेवण्यापूर्वी हात धुण्याची सवय नसते. जर तुम्ही तुमचं अन्न अशा व्यक्तीसोबत शेअर करत असाल तर त्याच्या हातातील बॅक्टेरिया तुमच्या शरीरात सहज प्रवेश करू शकतात.
वाढदिवशी केकचा तुकडा सगळ्यांना एकएक करुन खायला दिला जातो हे तुम्ही पाहिलं असेलच. असं करणं देखील टाळलं पाहिजे. कारण अशा वेळी केकवर वेगवेगळ्या लोकांच्या थुंकीचे थेंब लागलेले असतात. जर एखाद्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचा संसर्ग झाला असेल, तर तो संसर्ग केकच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सहज पोहोचू शकतो.
उष्टं खाल्ल्याने तोंडाला फोड येऊ शकतात. एखाद्याच्या थुंकीमुळे घसा आणि फुफ्फुसात संसर्ग होऊ शकतो. जिभेवर फोड येऊ शकतात. या समस्यांपासून दूर राहायचं असेल तर आजपासूनच उष्टं खाणं बंद करा.