Health Tips: ‘हे’ पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी; शरीरासाठी ठरेल घातक
कोणतीही फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. फळांमध्ये आधीच 80 ते 90 टक्के पाणी असतं. काहीवेळा फळांवर पाणी प्यायल्याने सर्दी किंवा खोकला होण्याची शक्यता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, यामुळे आपल्या दातांना त्रास होतो आणि दात कमकुवत होतात. आईस्क्रीम खाल्ल्याच्या 15 मिनिटांनंतर तुम्ही पाणी पिऊ शकता.
चहा, कॉफी किंवा कोणतीही गरम गोष्ट प्यायल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नका. त्यामुळे दात किडणे, पोटात जडपणा, गॅस आणि अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.
कोणतीही मिठाई किंवा साखर-मैदायुक्त पदार्थांचं सेवन केल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. कारण पाण्यामुळे शरीरातील साखर वाढते, अशा परिस्थितीत टाइप -2 मधुमेहाचा धोका वाढतो.
भाजलेले चणे खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावं, अन्यथा पोटदुखीची समस्या निर्माण होऊ शकते.
पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे सर्दीची समस्या लगेच उद्भवते.
शेंगदाणे खाल्ल्यानंतर बहुतेक वेळा पाणी पिण्याची इच्छा होते, परंतु त्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. नाहीतर खोकला, घसा खवखवणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
चना चाट खाल्यावर कधीही पाणी पिऊ नका. चना खाल्ल्यावर पाणी पिल्यावर चना व्यवस्थित पचत नाही. हे पचन प्रक्रियेवर परिणाम करते आणि पोटाच्या समस्या निर्माण करू शकते.