मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावला

नरेश लालवानी यांनी याप्रसंगी संबोधित करताना सर्व रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि आदरणीय ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.

independence day

1/7
77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी राष्ट्रीय ध्वज फडकविला...
2/7
मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रध्वज फडकावला.
3/7
नरेश लालवानी यांनी याप्रसंगी संबोधित करताना सर्व रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि आदरणीय ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
4/7
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात रेल्वेने देशाचे एकीकरण, नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार रेल्वे परिसर आणि रेल्वेगाड्याही आहेत, असे लालवानी म्हणाले.
5/7
‘हर घर तिरंगा’चा एक भाग म्हणून रेल्वे कर्मचाऱ्यांनीही आपल्या घरांमध्ये राष्ट्रध्वज लावला आहे.
6/7
नरेश लालवानी यांनी प्रदीप लोखंडे उपनिरीक्षक आरपीएफ, नागपूर यांना भारतीय पोलीस पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
7/7
नरेश लालवानी आणि सेंट्रल रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या अध्यक्षा शोभना लालवानी यांच्या हस्ते भायखळा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल येथे विविध सुविधांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी CRWWO च्या अध्यक्षा शोभना लालवानी आणि इतर सदस्य आलोक सिंग, अतिरिक्त महाव्यवस्थापक व विभाग प्रमुख, रजनीश कुमार गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Sponsored Links by Taboola