Black Rice : मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी काळा तांदूळ गुणकारी; जाणून घ्या फायदे...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 May 2023 05:34 PM (IST)
1
तांदूळ हे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे धान्य आहे. पण पांढरा तांदूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक मानला जातो, कारण त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
काळा तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. काळ्या तांदळात फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास खूप मदत करते.
3
काळा तांदूळ हृदयरोग आणि त्याचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
4
काळ्या तांदळ्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. या तांदळात प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठीही याचा फायदा होतो.