CSK vs GT IPL 2023 Final : चेन्नईनं पाचव्यांदा कोरलं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव, जडेजाचा विजयी चौकार पाहून धोनीही भावूक
कणर्धार धोनीचा संघ पाचव्यांदा इंडियन प्रीमियर लीग चॅम्पियन ठरला आहे. चेन्नईला विजयासाठी 171 धावांचं आव्हान होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजडेजाने शेवटच्या शतकात कमाल खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या दोन चेंडून 10 धावांची गरज असताना जडेजाने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर चौकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला.
जडेजाचा विजयी चौकार पाहून धोनीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. विजयानंतर धोनीनं जडेजाला घट्ट मिठी मारली. यावेळी धोनीनं डोळं मिटून घेत डोळ्यात साचलेले अश्रू अडवण्याचा प्रयत्न केला.
चेन्नई आणि गुजरातच्या सामन्यात आजही पावसाने ख्वाडा घातला. त्यामुळे जवळपास तीन तासांचा खेळ वाया गेला. पंचांनी दोन ते तीन वेळा खेळपट्टीची पाहणी केली. त्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय घेतला.
12.10 वाजता सामन्याला सुरुवात झाली. गुजरातनं 20 षटकांत 214 धावा केल्या. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला नवीन टार्गेट देण्यात आलं.
चेन्नईला 171 धावांचं आव्हान देण्यात आलं आणि सुपर किंग्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले.
चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे.
पण सामन्याला पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यानं डकवर्थ लुईस नियमांनुसार, चेन्नईला विजयासाठी 15 षटकात 171 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं. रोमांचक अशा अंतिम सामन्यात चेन्नईनं शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.
चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. गुजरातकडून शेवटच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती.
मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतर शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फक्त चेन्नईला फक्त एक धाव काढता आली. त्यानंतर चेन्नईला 4 चेंडूत 12 धावांची गरज होती.
तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एक-एक धावा मिळाली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर जडेजाने शानदार षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार ठोकत चेन्नईनं अंतिम सामना जिंकला.