Health Tips : वजन कमी करण्यापासून ते मधुमेह नियंत्रित करण्यापर्यंत जाणून घ्या पिस्ताचे फायदे

Health Tips
1/7
मधुमेहाच्या रूग्णांना अनेकदा खाण्यापिण्याची योग्य काळजी घ्यावी लागते. काहींना तर नेमके काय खावे आणि काय खाऊ नये हेही कळत नाही. अनेक वेळा लोक चुकून अशा गोष्टी खातात ज्यामुळे रक्तातील साखर वाढते.
2/7
जर तुम्ही ड्रायफ्रुट्सबद्दल गोंधळलेले असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की मधुमेहाचे रुग्ण पिस्ता सहज खाऊ शकतात. बदाम, अक्रोड आणि काजू हे देखील मधुमेही रुग्ण खाऊ शकतात. पिस्ता एक असा ड्राय फ्रूट आहे जो खायला खूप चवदार लागतो. भाजलेल्या पिस्त्याची खारट चव आणखी छान लागते.
3/7
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही सहज पिस्ता खाऊ शकता. पिस्ता खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. पिस्त्यामध्ये भरपूर पोषक घटक आणि फायबर असतात. याशिवाय अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, कर्बोदके आणि प्रथिने आढळतात. पिस्त्यामध्ये फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात.
4/7
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पिस्ता खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की पिस्ता खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.
5/7
रोज पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. हे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. आपल्याला जास्त भूक लागत नाही, आपण जास्त खाणे टाळतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
6/7
पिस्त्यात लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे अॅनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी देखील असते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते.
7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 06 Jun 2022 05:27 PM (IST)