PHOTO: याला म्हणतात नशीब! 'या' टीव्ही अभिनेत्रीला बॅक टु बॅक ऑफर्स...
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांनी केवळ इंडस्ट्रीतच नाही तर प्रत्येक घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो :jasminbhasin2806/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेत्रीला एकापाठोपाठ एक अनेक प्रोजेक्ट्स ऑफरही होत आहेत. आजकाल जस्मिनचं नशीब जोरात आहेत.(फोटो :jasminbhasin2806/ig)
जास्मिन भसीन सध्या एकामागून एक नवीन प्रोजेक्ट्स साइन करत आहे. दरम्यान, आता ही अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली आहे. (फोटो :jasminbhasin2806/ig)
मनीष चव्हाण दिग्दर्शित एका चित्रपटात ती दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाची कथा महेश भट्ट यांनी लिहिली असल्याची माहिती आहे.(फोटो :jasminbhasin2806/ig)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षी जुलैच्या अखेरीस जास्मिन या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. सध्या या चित्रपटाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही, मात्र ही बातमी समोर आल्याने जास्मिनचे चाहते खूपच खूश आहेत.(फोटो :jasminbhasin2806/ig)
जस्मिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल तिच्याकडे अनेक टीव्ही शो व्यतिरिक्त म्युझिक व्हिडिओंच्या ऑफर आहेत.(फोटो :jasminbhasin2806/ig)
त्याचबरोबर ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या पंजाबी चित्रपट 'हनीमून'मुळे चर्चेत राहिली आहे. नुकतेच जस्मिनने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. (फोटो :jasminbhasin2806/ig)