Health Tips : मानसिक आरोग्य बिघडल्यावर 'ही' 6 लक्षणं दिसतात; तुम्हालाही जाणवत असतील तर वेळीच सावध व्हा
जर तुम्हाला खाली नमूद केलेल्या लक्षणांपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर तुम्हाला उपचारांची आवश्यकता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमानसिक विकारामुळे व्यक्तीच्या भावनांवरही परिणाम होतो. रुग्ण एकतर कोणत्याही एका गोष्टीवर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही किंवा कोणत्याही एका गोष्टीवर खूप जास्त प्रतिक्रिया देऊ लागतो.
ज्या लोकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले नसते ते प्रत्येक कामात रस कमी दाखवू लागतात. हळूहळू असे लोक स्वतःला निरुपयोगी समजायला लागतात.
छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे, मनासारखी एखादी गोष्ट न होणे, सतत मूड बदलणे, किंवा प्रत्येक समस्येवर रडायला येणे हे देखील वाईट मानसिक स्थितीचे लक्षण आहे.
जेव्हा मानसिक आरोग्य बिघडते तेव्हा झोपण्याच्या पद्धतीत बदल होतो. काही लोक खूप झोपतात, तर काहींची झोप कमी होते. वजनातही बदल होतो. काही लोक खूप खातात तर काहींना भूक लागत नाही, अशा स्थितीत तुमचे वजन कमी-जास्त होऊ शकते.
तुमच्या आजूबाजूला अनेक जण असून सुद्धा तुम्हाला एकटं वाटणं, कोणाशीही बोलावंसं न वाटणं ही परिस्थिती तुमची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्ट करते.
कोणत्याही परिस्थितीमागे स्वत:ला दोष देणं, अपयश पचवता न येणं हे देखील मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचे लक्षण आहे.