Monsoon Update : देशात अस्मानी संकट! 8 राज्यांमध्ये पूरस्थिती, अतिवृष्टीमुळे झालेल्या विध्वंसाचं वास्तव पाहा
देशातील आठ राज्यांमध्ये पावसामुळे सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यांतील अनेक भाग पाण्यात बुडाले आहेत. (PC : PTI))
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहवामान खात्याने देशातील अनेक राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आठ राज्यांमध्ये अधिकृतरित्या पूरस्थिती घोषित करण्यात आली आहे. (PC : PTI)
या राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, केरळ, गोवा-कर्नाटक आणि नागालँडच्या नावांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. (PC : PTI)
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे 133 रस्ते बंद आहेत. हवाई उड्डाणे आणि रेल्वे गाड्यांचं वेळापत्रकही विस्कळीत झाले आहेत. (PC : PTI)
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. (PC : PTI)
उत्तराखंडमध्ये खराब हवामानामुळे 154 रस्ते बंद करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.(PC : PTI)
आसाममधील 6 जिल्ह्यांमध्ये 121 गावांतील सुमारे 22 हजार लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.image 10
एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना कारगिलमध्ये 4 ते 5 इंच बर्फवृष्टी झाली आहे. (PC : PTI)
हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसानं कहर केला आहे. राज्याच्या विविध भागात भूस्खलनामुळे मोठं नुकसान झालं आहे. शिमला जिल्ह्यातील कुमारसैन भागात ढिगाऱ्याखाली दबल्याने एक जोडप्याचा आणि एका मुलाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले.(PC : PTI)
हिमाचलमध्ये 8 आणि 9 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारपासूनच राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. (PC : PTI)
उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. (PC : PTI)
जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे यंदाची अमरनाथ यात्रा सलग तिसऱ्या दिवशी पाऊस आणि भूस्खलनामुळे स्थगित करण्यात आली आहे. (PC : PTI)