Health Tips : जास्त वेळ बसणे अनेक आजारांना आमंत्रण, आरोग्यावर होतो फार वाईट परिणाम
व्यायामामुळे (Exercise) शरीराची हालचाल होते आणि निरोगी राहण्यास मदत होते. निरोगी शरीरासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. ( Image Source : istockphoto )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहालचाल न करता एका जागी स्थिर बसल्यामुळे अनेक समस्यांना आमंत्रण मिळते. दिवसभर एका जागी बसण्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो. यामुळे आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.( Image Source : istockphoto )
एका संशोधनानुसार, दिवसभर बसून राहण्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. स्थिर बसून शरीरावर होणारा परिणाम टाळण्यासाठी दर अर्ध्या तासाला शरीराची हालचाल होणे गरजेचं आहे. ( Image Source : istockphoto )
यासाठी तुम्ही दर अर्ध्या तासाने किमान पाच मिनिटे चालण्याची सवय करून घ्यावी. जर्नल मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे . ( Image Source : istockphoto )
या अहवालानुसार, दर अर्ध्या तासाने पाच मिनिटे चालल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. ( Image Source : istockphoto )
जर्नल मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजकडून याबाबत एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनात 11 मध्यमवयीन व्यक्ती आणि वृद्धांचा समावेश करण्यात आला. ( Image Source : istockphoto )
या संशोधनात असे आढळून आले की, दर अर्ध्या तासाने पाच मिनिटे चालण्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचे प्रमाण 60 टक्के कमी होते. याच्या तुलनेत दिवसभर बसण्याऱ्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण 4 ते 5 टक्के होते. ( Image Source : istockphoto )
नियमितपणे शरीराची हालचाल केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दर तासाला एक मिनिट चालल्याने रक्तदाबही 5 टक्के कमी झाल्याचेही संशोधनात आढळले. ( Image Source : istockphoto )
वेळोवेळी शरीराची हालचाल केल्याने शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. या संशोधनात आढळेले की, दिवसभर बसून काम करण्याऐवजी दर अर्ध्या तासाला पाच मिनिटे चालल्याने व्यक्तींना कमी थकवा जाणवत होता. त्याचा मूडही चांगला होता.( Image Source : istockphoto )
चालण्यामुळे त्यांना अधिक ऊर्जा मिळाली. या संशोधनाच्या अहवालानुसार, दर तासाला थोडे चालणे यामुळे मूड सुधारू शकतो. थकवाही कमी होतो आणि रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते, हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.( Image Source : istockphoto )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.( Image Source : istockphoto )