Photo : थंडी वाढली मागणी घटली, केळीच्या दरात घसरण
सध्या राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्याचा परिणाम शेती पिकांच्या दरावर होत आहे. नंदुरबारमध्ये केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदुरबार जिल्ह्यात वाढलेल्या थंडीमुळे केळीच्या दरात घसरण झाली आहे. याचा मोठा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
उत्तर महाराष्ट्र केळीचे सर्वात मोठ हब आहे. देशभरात आणि विदेशात येथून केळी पाठवली जात असते. मात्र, उत्तरेत थंडीचे प्रमाण वाढले की व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील मध्यस्थी करणारे दलाल कमी भावात केळीची खरेदी करतात.
नंदूरबार बाजार समितीने एक क्विंटल केळीला 1 हजार 200 ते 1 हजार 300 रुपयांचा दर जाहीर केला आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 500 ते 600 रुपयांचा दर मिळत असल्याची स्थिती नंदुरबार जिल्ह्यात आहे.
उत्तर महाराष्ट्रात केळीचे दर रावेर बाजार समितीत ठरत असेल तरी 95 टक्के केळीची विक्री शेतीच्या बांधावर होत असते.
शेतकरी आणि व्यापारी यांच्यात मध्यस्थी करणारे दलाल केळीचे भाव ठरवत असतात. केळीला सर्वाधिक मागणी उत्तर भारतात असते.
गेल्या आठ दिवसांपासून उत्तर भारतात थंडीचे प्रमाण वाढल्याने केळीची मागणी कमी झाल्याचे सांगत दलालांनी केळीचे दर कमी केल्याचे चित्र शहादा तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.
बाजार समितीने 1 हजार 200 ते 1 हजार 300 रुपयांचा दर जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 500 ते 600 रुपयांचा दर मिळत असल्याचे चित्र आहे.
वातावरणामध्ये वारंवार होणाऱ्या बदलांचा फटका फळबागांना बसत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टांनी उपाययोजना करुन आपल्या बागा वाचवल्या आहेत.