Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Photo : जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी, नदी नाले गोठले
जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. तिथे उणे तापमानाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी बर्फवृष्टी सुरु आहे. नदी नाले गोठले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तर तापमानाचा पारा उणेमध्ये गेला आहे. त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
जम्मू काश्मीरमध्ये लेह लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे.
रस्त्यांवर बर्फ पडल्यामुळं जनजीव विस्कळीत झालं आहे. कारण तिथे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत.
वाढत्या थंडीचा परिणाम मानवी जीवनावर देखील होत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवत आहेत.
थंडी एवढी तीव्र आहे की नदी नाले पूर्णपणे बर्फाचे बनले आहेत. ज्या नदी-नाल्यांमध्ये भरपूर पाणी वाहत आहे, तिथे बर्फाच्या रूपात पाणी वाहत आहे.
थंडीमुळं लडाख आणि कारगिलच्या बाजारपेठा रिकाम्या पडल्या आहेत. बाजारात फार कमी लोक येत आहेत.
सर्वत्र रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. त्यामुळं वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.
कडाक्याच्या थंडीमुळं पिण्याच्या पाण्याच्या सर्व पाइपलाईन गोठल्या आहेत. त्यामुळं लोकांना आता विहिरीतून पाणी भरावे लागत असल्याची स्थिती आहे.
लडाखमध्ये उणे 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर कारगिलमध्ये ते उणे 20.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.