Monsoon: पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं टाळा; नाहीतर बिघडेल आरोग्य
पावसाळा आला की साथीचे आजार वाढतात. काही भाज्यांवरही त्याचा परिणाम होतो आणि आपले आरोग्य बिघडते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाळा आला की काही भाज्या खाणं टाळल्या पाहिजेत. कारण बहुतेक भाज्यांमध्ये पावसाळा आला की किडे किंवा अळ्या पडण्यास सुरुवात होते.
पावसाळा सुरू झाला की पालेभाज्या खाणं टाळलं पाहिजे. पालक, मेथी, शापू अशा भाज्या खाणं पावसाळ्यात टाळावं, कारण या भाज्यांमध्ये छोट्या-छोट्या हिरव्या अळ्या पडतात.या अळ्या बहुतांश वेळा पानांच्या रंगाच्या असतात आणि काही वेळा आपल्या डोळ्यांना दिसत नाही.
हिरव्या पालेभाज्यांव्यतिरिक्त कोबी आणि फ्लॉवर खाणं देखील पावसाळ्यात टाळलं पाहिजे. पावसाळा सुरू झाला की या भाज्यांध्ये देखील अळ्या पडण्यास सुरुवात होते.
पावसाळ्यात मशरुम खाणं देखील बंद करावं. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्याने उलटी आणि पोटदुखी सारख्या समस्या उद्भवतात.
पावसाळ्यात शिमला मिरची देखील खाणं टाळलं पाहिजे. पावसाळा सुरू झाला की शिमला मिरचीत किडे पडण्यास सुरुवात होते.