Health Tips: शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी फक्त दूध पिणं योग्य आहे का? जाणून घ्या
प्रत्येकाला माहित आहे की दूध हे कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. दूध प्यायल्याने हाडं तर मजबूत होतातच, पण स्नायूही मजबूत होतात. पण फक्त दूध प्यायल्याने कॅल्शियमची कमतरता पूर्ण होईल का?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही दिवसभरात एक कप दूध प्यायले तर याचा अर्थ तुम्ही 300 मिलीग्राम कॅल्शियम घेत आहात. एका व्यक्तीने रोज 1000 मिलीग्राम पर्यंत कॅल्शियम घ्यायला पाहिजे. 1000 मिलीग्राम कॅल्शियमचं सेवन करण्यासाठी तुम्ही एका दिवसात 4 कप दूध पिऊ शकता.
दुधाव्यतिरिक्त तुम्ही कॅल्शियमसाठी अंडी देखील खाऊ शकता. एका अंड्यामध्ये फक्त 50 मिलीग्राम कॅल्शियम आढळतं. दूध आणि अंडी व्यतिरिक्त तुम्ही दही आणि ताक देखील घेऊ शकता.
9 ते 18 वर्षांपर्यंतच्या लोकांनी दररोज 1300 मिलीग्रामपर्यंत कॅल्शियम घ्यावं. तर 19 ते 50 वर्षांपर्यंतच्या लोकांनी 1000 मिलीग्राम कॅल्शियम घ्यावं. गरोदर स्त्रिया आणि बाळांना दूध देणाऱ्या मातांनी दररोज 1000 mg पेक्षा जास्त कॅल्शियम घ्यावं.
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुधाव्यतिरिक्त तुम्ही सोयाबीन, व्हाईट बीन्स, ब्रोकोली, ओट्स, दही, टोफू इत्यादींचं सेवन करू शकता.