अंबाबाई मंदिरात अधिक मासातील धार्मिक अनुष्ठान; पंचगंगा घाटावर स्नान, धार्मिक विधी संपन्न
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन दिवसांपासून मंदिरात अधिक मासातील धार्मिक अनुष्ठानाला प्रारंभ झाला आहे.
आज तिसऱ्या दिवशीही विविध धार्मिक विधी झाले.
प्रत्येक वर्षी श्रीपूजक मंडळातर्फे अधिक मासात धार्मिक अनुष्ठान केले जाते.
त्याची सांगता उत्सवमूर्तीच्या अवभृत स्नानाने होते.
तोफेची सलामी दिल्यानंतर श्री अंबाबाईची पालखी या सोहळ्यासाठी महाद्वार, पापाची तिकटी, गंगावेश या मार्गावरून पंचगंगा घाटावर पोहोचली.
येथे स्नान व विविध धार्मिक विधी पार पडले.
मंदिरात सलग तीन दिवस धार्मिक अनुष्ठान असल्याने कालपासून दर्शन रांगेमध्ये थोडा बदल करण्यात आला होता.
आज दुपारपासून दर्शन रांगेची व्यवस्था पूर्ववत होईल, असे मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी म्हटले आहे.
सर्वत्र शांतता, सलोखा आणि सर्वांगीण आरोग्याबरोबरच सुबत्तेसाठी प्रत्येक वर्षी श्रीपूजक मंडळातर्फे अधिक मासात धार्मिक अनुष्ठान केले जाते.