Health Tips: आवळ्याचा रस शरीरासाठी जबरदस्त फायदेशीर; तुम्हाला आवळ्याच्या रसाचे 'हे' अनोखे फायदे माहिती आहेत का?
आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचं सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. आवळा केस, त्वचा आणि पोटासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआवळ्याचा रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, जे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. हा रस प्यायल्याने कोलेस्टेरॉलही कमी होऊ शकते.
आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते. यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. पचन सुधारते, बद्धकोष्ठता आणि गॅसपासून मुक्ती मिळते.
आवळ्यात शीतकरण प्रभाव आहे. उन्हाळ्यात त्याचा रस प्यायल्याने पोटाची जळजळ शांत होते. शरीरही थंड राहते.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आढळते. यामुळे डोळ्यांसाठीही ते फायदेशीर आहे. त्याचा रस प्यायल्याने दृष्टी वाढण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. यात अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात जे साखरेची पातळी राखण्यास मदत करतात.
आवळ्याचा रस प्यायल्याने त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.केसांना ताकद मिळते. केस काळे होतात.स्काल्पमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे केस मजबूत होतात.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. आवळ्याचा किंवा आवळ्याच्या रसाचा आहारात समावेश केल्यास संसर्गांशी लढण्यास मदत होते.