Sulochana Latkar : सुलोचना दीदींची कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल : देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुलोचना लाटकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर शोक व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावं अशी आहेत. ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे ती अजरामर आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. यातीलच एक नाव सुलोचनादीदींचे आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,माझ्या पिढीने सुलोचना दीदींना आईच्या रुपात बघितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,सुलोचना दीदींची कारकीर्द अतिशय थक्क करणारी आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
सुलोचना दीदींबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,पुरस्कारांपेक्षा सुलोचना दीदीचे कार्य मोठे आहे. त्यांनी गाजवलेली कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरेल.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तेजस्वी, सात्विक, सोज्वळ, घरांदाज, वात्सल्यमूर्ती, खंबीर...अशी विविध स्त्री रूपे मराठी-हिंदी चित्रपटांच्या पडद्यावर जिवंत केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण सुलोचनादीदी यांना अखेरचा निरोप, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट केलं आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
सुलोचना लाटकर यांच्या पार्थिवावर आज 5.30 वाजता शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.