Health: चहाप्रेमींनो सावधान..! तुम्ही भेसळयुक्त चहा तर पित नाही ना? खरा-खोटा चहा कसा ओळखायचा?
चहाचे शौकीन असलेल्या चहाप्रेमींना प्रत्येक ऋतूमध्ये चहाचा आस्वाद घेणे आवडते, परंतु तुम्हाला माहित आहे का? आजकाल बाजारात नकली चहा पावडर मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही ठिकाणी चहाच्या पावडरमध्ये लोखंडाची पावडर, कोरडे शेण, लाकडाचा भुसा आणि रंग यांसारख्या अनेक गोष्टी मिसळत असल्याच्या धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत
अशात खरी आणि बनावट चहाची पाने कशी ओळखायची हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आम्ही तुम्हाला काही पद्धती सांगत आहोत.
पहिला उपाय म्हणजे चहाची पाने हातावर एक ते दोन मिनिटे घासणे. तुमच्या हातात कोणताही रंग दिसला तर समजून घ्या की चहा पावडरमध्ये काहीतरी मिसळले आहे.
दुसरा मार्ग म्हणजे एक ग्लास थंड पाणी घेणे. त्यात 1 ते 2 चमचे चहाची पाने टाका आणि सोडा. काही वेळाने पाण्यात रंग दिसला तर समजा चहाच्या पानात भेसळ आहे.
तिसरा मार्ग म्हणजे टिश्यू पेपर घ्या आणि त्यावर 2 चमचे चहा पावडर ठेवा. यानंतर पानांवर पाण्याचे काही थेंब टाका आणि काही वेळ उन्हात ठेवा. चहाच्या पानात भेसळ असल्यास टिश्यू पेपरवर डाग पडतात. जर तेलाचे डाग किंवा खुणा नसतील तर समजून घ्या की चहाच्या पानात भेसळ नाही.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )