Health Care: चुकून च्युइंगम गिळल्यास काय होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
अनेक वेळा लोक च्युइंगम खाताना चुकून गिळतात. हे बऱ्याचदा लहान मुलांसोबत घडतं. आता प्रश्न असा येतो की, च्युइंगम गिळल्याने शरीरावर काही दुष्परिणाम होतात का? किंवा शरीराच्या अवयवांना काही नुकसान होतं का? जाणून घेऊया...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, गिळल्यानंतर च्युइंगम पोटाच्या लाईनिंगपर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. बऱ्याच लोकांना वाटतं की च्युइंगम 7 वर्षं पोटात राहतं. पण असं असताना अजिबात नाही.
च्युइंगम पचवता येत नाही हे खरं आहे, कारण तो कधीही न विरघळणारा पदार्थ आहे.
च्युइंगम पचत नाही, पण काही तासांत किंवा काही दिवसांत ते स्टूलमधून आपोआप बाहेर येतं.
च्युइंगम नेहमी मर्यादित प्रमाणात सेवन करावं, कारण वारंवार चुकून तुमच्या पोटात च्युइंगम गेल्यास पचनसंस्थेवर वाईट परिणाम होईल.