Mangeli Waterfall : तीन राज्यांच्या सीमेवरुन वाहणारा देशातील एकमेव धबधबा, मांगेली धबधब्याची पर्यटकांना भुरळ
महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर असणारा मांगेली धबधबा पर्यटकांना भुरळ घालत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगर्द हिरव्यागार सह्याद्रीच्या वनराईत फेसळणारा हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील सिंधुदुर्गाच्या तिलारी खोऱ्यात हा धबधबा आहे.
या मांगेली धबधब्यापर्यंत जाण्यासाठी पर्यटकांना ट्रेकिंग करत जावं लागतं.
त्यामुळे पर्यटकांना ट्रेकिंगचा देखील आनंद घेता येत आहे.
ट्रेकिंग करुन जेव्हा आपण धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचतो तेव्हा उंचावरून कोसळणारा धबधबा जणू आपलं स्वागत करत आहे असा भास होतो.
कारण 200 ते 250 फुटांवरुन कोसळणार धबधब्याचं पाण्याचे तूषारात रुपांतर होत आणि पर्यटकांना ओल चिंब करुन टाकतो.
निवांत घनदाट जंगलात गेल्यावर निसर्ग संपन्न परिसर पाहून पर्यटकांचे पाय परतीच्या प्रवासाला लागतच नसल्याचं चित्र सध्या आहे.
धुक्याने व्यापलेल्या परिसरातून पर्यटक वाट काढत धबधब्यापर्यंत जातात.
ऊन आणि पाऊस असा निसर्गाचा खेळ पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं मांगेली धबधब्यांकडे वळतात.