Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur News: राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील संततधार पावसामुळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेला राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने धबधबा पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा राऊतवाडी धबधबा पर्यटकांनी बहरुन जाण्याची शक्यता आहे.
राधानगरी तालुक्यातील मुसळधार पावसाने राऊतवाडी धबधब्याने रौद्ररुप धारण केले होते.
त्यामुळे अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव 20 जुलैपासून अनिश्चित काळासाठी धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता.
मात्र, गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे.
त्यामुळे धबधबा पुन्हा एकदा पर्यटनासाठी सुरु करण्यात आला आहे.
त्यामुळे पर्यटकांना पुन्हा एकदा वर्षा पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.8
दुसरीकडे, राधानगरी धरणाचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा खुला झाला आहे.
धरणातून भोगावती नदीपात्रात 2828 क्युसेकने विसर्ग सुरु आहे.