Health Benefits of Pistachios : हिवाळ्यात पिस्ते खाण्याचे जबरदस्त फायदे, जाणून घ्या दिवसात किती पिस्ते खावे?
हिवाळ्यात पिस्ते खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जाणून घ्या दिवसातून किती पिस्त्यांचे सेवन करावे. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात पिस्ते खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. पिस्त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम, प्रथिने इत्यादी अनेक पोषक तत्वे आढळतात. ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. (Photo Credit : Pixabay)
निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज किमान ३ ते ४ पिस्ते खावेत. पिस्ता खाल्ल्याने एनर्जी लेव्हल वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच हाडे आणि दात मजबूत होण्यास मदत होते.(Photo Credit : Pixabay)
पिस्ता हृदयासाठी खूप फायदेशीर मानला जातो. पिस्त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि फायबर रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (LDL) चे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)
पिस्त्यामध्ये आढळणारे पोषक तत्व त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. पिस्त्यात व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड्ससारखे अनेक घटक असतात जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात.(Photo Credit : Pixabay)
वाढत्या वजन आणि लठ्ठपणाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी पिस्ता हा एक चांगला पर्याय असू शकतो. पिस्त्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात परंतु त्यात फायबर आणि पाणी जास्त असते.(Photo Credit : Pixabay)
पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. यामध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते. पिस्त्याचे तेल त्वचेसाठीही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. पिस्त्यात तांब्याचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे केसांना पोषण मिळते.(Photo Credit : Pixabay)
पिस्त्यात लोह आणि तांबे भरपूर प्रमाणात असते. यामुळे अॅनिमियासारख्या समस्या दूर होतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी देखील असते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते.(Photo Credit : Pixabay)
नियमित पिस्ता खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळतं. त्यामुळे पोटाचा आणि पचनाचा त्रास होत नाही. पिस्ता खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. पिस्त्याचा आहारात नक्कीच समावेश करावा.(Photo Credit : Pixabay)
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पिस्ता खूप फायदेशीर आहे. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, पिस्ता खाल्ल्याने मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लायसेमिक पातळी, रक्तदाब, जळजळ आणि लठ्ठपणाची समस्या कमी होते.(Photo Credit : Pixabay)