Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coriander seeds : धने आहेत अनेक आजारांवर गुणकारी, अनेक आजारांवर आहे 'हा' घरगुती उपाय!
धने एक असा पॉवरफुल मसाला आहे, ज्याचे सेवन केल्यावर हार्मोनल असमतोल असणाऱ्या आजारांवर मात होऊ शकते. (Photo Credit : Pexel.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेवळ भाजीतच नाहीत तर धणे अनेक आजारांवरही गुणकारी ठरतात. औषधीय गुणांनी युक्त असणारे धणे हे थायरॉईडची समस्या कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतात. Photo Credit : Pexel.com)
धन्याच्या पाण्याचे सेवन हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात आणि आजारांशी लढण्यास मदत करतात. Photo Credit : Pexel.com)
धणे अनेक पौष्टिक घटकांच्या गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याचे औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. हे शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्वे ए,सी यासह अनेक पोषक तत्वांचा पुरवठा करते. Photo Credit : Pexel.com)
सकाळी रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिणे अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणून काम करते Photo Credit : Pexel.com)
धण्याचे पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. कारण धण्याचे पाणी पचनाची समस्या देखील दूर करते आणि पोटात गॅस, जळजळ इत्यादी समस्या शांत करते. Photo Credit : Pexel.com)
धण्याचे पाणी पिणे त्वचेसाठी खूप गुणकारी मानले जाते. कारण कोथिंबीरमध्ये भरपूर लोह असते. त्यात अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. कोथिंबीरीच्या पाण्याचे सेवन केल्याने चेहरा चमकदार होतो. ते तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. Photo Credit : Pexel.com)
कोथिंबिरीचे पाणी पिणे केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण कोथिंबीरमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीच्या गुणधर्मांमुळे ते ठिसूळ आणि कमकुवत केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. Photo Credit : Pexel.com)
धण्याचे पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. कारण याच्या नियमित सेवनाने साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. Photo Credit : Pexel.com)