Benefits Of Eating Watermelon Seeds : कलिंगडाच्या बिया चुकूनही फेकू नका, फायदे वाचून व्हाल थक्क
आजवर आपण छान रसाळ व मधाळ कलिंगडाचे अनेक फायदे ऐकले आहेत. शरीर हायड्रेटेड राहते, त्वचा तुकतुकीत दिसते वैगरे. पण कलिंगडाच्या इतक्याच्या त्याच्या बिया सुद्धा अत्यंत फायदेशीर असतात, हे तुम्हाला माहित होतं का? अनेकदा जितक्या कमी बिया असतील तितकं कलिंगड चांगलं असा आपला समज असतो पण मंडळी हे अगदीच चुकीचं आहे.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक फळांच्या बियांमध्ये अत्यंत पोषक अशी सत्व असतात, जसे की शिया सीड्स, सूर्यफुलाच्या बिया इत्यादी, त्याच प्रमाणे कलिंगडाच्या बिया सुद्धा तुमच्या आरोग्याला खूप मदत करू शकतात, आता ही मदत नेमकी कशी हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया(Photo Credit : Pixabay)
हृदयाचे आरोग्य :कलिंगडाच्या बिया मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत आहेत. यामुळे रक्तदाब नियंत्रित करून आणि हृदयाला निरोगी राखण्यात मदत होऊ शकते.(Photo Credit : Pixabay)
रोगप्रतिकारक शक्तीसाठी :मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी झिंक महत्त्वपूर्ण आहे. कलिंगडाच्या बियांमध्ये झिंक सत्व मुबलक प्रमाणात आढळते. जस्तच्या साहाय्याने संक्रमण आणि कोणत्याही विकाराशी लढण्यास मदत करणाऱ्या रोगप्रतिकारक पेशी तयार होतात आणि सक्रिय होतात.(Photo Credit : Pixabay)
पाचक आरोग्य :कलिंगडाच्या बियांमध्ये फायबर आणि अनसॅच्युरेटड फॅट्स असतात, जे पाचन आरोग्यास मदत करतात आणि आतड्यांना निरोगी बनवू शकतात.(Photo Credit : Pixabay)
निरोगी त्वचा आणि केस :कलिंगडाचा फेस मास्क वापरण्यासाठी आपल्या आई- आजीने कित्येकदा सांगितले असेल. पण त्याही पेक्षा प्रभावी कलिंगडाच्या बियांनी बनवलेले हेअर व फेसमास्क ठरू शकतात. कलिंगडाच्या बियांमध्ये प्रथिने आणि आवश्यक फॅटी अॅसिड भरपूर असतात, ज्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञ म्हणतात. हे पोषक घटक सूज कमी करण्यास आणि मुरुमांपासून बचाव करण्यास देखील मदत करू शकतात.(Photo Credit : Pixabay)
हाडांचे आरोग्य :आपल्याला माहित आहे की मजबूत आणि निरोगी हाडे ठेवण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता असते आणि कलिंगडाच्या बियांमध्ये कॅल्शियम मुबलक असते. हाडांच्या आरोग्याव्यतिरिक्त, ते स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि योग्य मज्जातंतू प्रणालीसाठी देखील मदत करतात.(Photo Credit : Pixabay)
तुम्ही विचार करत असाल की हे फायदे तर सर्व समजले पण आता या बिया खायच्या कशा? कलिंगडाच्या बिया खाण्यायोग्य बनवण्यासाठी तुम्ही ओव्हनमध्ये शिजवू शकता किंवा तव्यावर भाजून घेऊ शकता. (Photo Credit : Pixabay)
चव वाढवण्यासाठी या बियांमध्ये मीठ किंवा इतर मसाले घालून छान चटपटीत स्नॅक्स तयार करू शकता. याशिवाय तुम्ही या भाजलेल्या बियांमध्ये अन्य काही हर्ब्स टाकून छान पावडर बनवून घेऊ शकता जी तुम्ही भाजीत किंवा कोशिंबिरीत घालून चवीची मज्जा घेऊ शकाल.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo Credit : Pixabay)