Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
H3N2 Virus : चिंताजनक! H3N2 व्हायरसचा धोका, कोरोनासारखा पसरतो इन्फ्लुएंझा, स्वत:चं संरक्षण कसं कराल?
हवामान बदलामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय. सर्दी आणि सततचा खोकला यावर औषधही काम करेनाशी झाली आहेत.(PC : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔषधं घेतल्यानंतरही बहुतेकांना खोकल्यापासून पूर्णपणे आराम मिळालेला नाही. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नं हा नवा व्हायरस असल्याचं सांगितलं आहे. (PC : istock)
ICMR नं दिलेल्या माहितीनुसार, हे एका प्रकारच्या इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे होत आहे. (PC : istock)
H3N2 हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरतो. डब्ल्यूएचओच्या मते, गर्दीच्या ठिकाणी हा विषाणू सहज पसरू शकतो.(PC : istock)
सध्या देशात इन्फ्लूएंझा A चा H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढला आहे. H3N2 मुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. (PC : istock)
दरम्यान, मेदांताचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नागरिकांना घाबरू नका असा सल्ला दिला आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं की, देशात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला आहे. पण सर्दी-खोकला आणि ताप या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. (PC : istock)
अनेक राज्यांमध्ये इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार H3N2 व्हायरसचा संसर्ग वाढला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. H3N2 व्हायरसचा संसर्ग दरवर्षी या वेळी पाहायला मिळतो. (PC : istock)
H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.(PC : istock)
डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं आहे की, या इन्फ्लूएंझापासून गंभीर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी लस घेणं आवश्यक आहे. (PC : istock)
तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या व्हायरसला हंगामी ताप म्हटलं आहे, हा विषाणू पाच ते सात दिवस टिकतो. IMA ने संक्रमित व्यक्तीला अँटीबायोटिक घेणं टाळण्याचा सल्ला दिला आहे.(PC : istock)