Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amravati Meghnath Yatra : मेळघाटात आदिवासींची 'मेघनाथ' यात्रा, उंच स्तंभाला लटकून नवस फेडले!
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये अनेक ठिकाणी होळी निमित्य मेघनाथची पूजा केली जाते आणि यावेळी मोठी यात्राही भरते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेळघाटातील कोरकु आदिवासी आपली संस्कृती आणि परंपरा अजूनही जपून आहेत. त्यांचा वर्षांतील सर्वात महत्वाचा सण म्हणजे होळी आणि रंगपंचमी. बाहेरगावी कामानिमित्त असलेले बांधव होळीसाठी आवर्जून उपस्थित होतात.
अत्यंत दुर्गम भागात ही कोरकु ढाण्याच्या (वस्तीच्या) मधोमध मेघनाथाची स्थापना केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून अनेक ठिकाणी आदिवासी लोक त्याची पूजा करतात.
भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी श्रद्धेने नवस देखील बोलतात आणी मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तो नवस फेडायला या ठिकाणी येतात.
यावेळी मेघनाथ बाबांच्या उंच स्तंभाला लटकून भाविकांचा नवस फेडला जातो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजतागायत सुरु असल्याचे भाविक सांगतात.
मेघनाथ यात्रा ही आदिवासी बांधवांच्या आस्थेचे स्थान आहे. मागील अनेक वर्षांपासून ही यात्रा भरते आणि नागरिक याठिकाणी येत असतात.
दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग पंचमीपासून मेळघाटातील अनेक गावात ही मेघनाथ यात्रा भरते.
या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे उंच स्तंभाला लटकून भाविक आपला नवस पूर्ण करतात. यंदाही या यात्रेत आदिवासी बांधवांची गर्दी दिसून आली..
या यात्रेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणी आमदार रवी राणा यांनी देखील भेट दिली. मेळघाटमध्ये ज्या ज्या ठिकाणी ही यात्रा भरते त्या प्रत्येक ठिकाणी आपण मेघनाथ बाबांचा स्तंभ देऊ असे आश्वासनही यावेळी खासदार राणा यांनी दिले.