Satish Kaushik: मिस्टर इंडिया ते राम लखन; 'या' हिट चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांनी केलं काम

सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे.त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. जाणून घेऊयात सतीश कौशिक यांच्या चित्रपटांबद्दल....

Satish Kaushik

1/9
अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
2/9
सतीश कौशिक यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.
3/9
सतीश यांनी काही विनोदी भूमिका देखील साकारल्या. जाणून घेऊयात सतीश कौशिक यांच्या चित्रपट आणि मालिकांबद्दल....
4/9
सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये रिलीज झालेल्या जाने भी दो यारो या चित्रपटात अशोक ही भूमिका साकारली. तसेच 1983 मध्येच रिलीज झालेल्या वो 7 दिन, मासूम, मंडी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं.
5/9
1987 मध्ये रिलीज झालेल्या मिस्टर इंडिया या चित्रपटामधील त्यांनी साकारलेल्या कॅलेंडर या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
6/9
मिस्टर अँड मिसेस खिलाडी, क्यू की मैं झूठ नहीं बोलता यांसारख्या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकरली. अभिनेता गोविंदासोबत अनेक चित्रपटात सतीश यांनी काम केलं
7/9
गोविंदा आणि सतीश यांच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
8/9
सतीश यांचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगना रनौतनं दिग्दर्शित केलेल्या इमर्जन्सी या चित्रपटात त्यांनी जगजीवन राम ही भूमिका साकारली.
9/9
सतीश यांनी चित्रपटांबरोबरच मालिकांमध्ये देखील काम केले. त्यांनी कथा सागर, मे आय कम इन मॅडम या मालिकांमध्ये काम केलं. तसेच त्यांनी स्कॅम 1992  या सीरिजमध्ये देखील काम केलं.
Sponsored Links by Taboola