Dance Effect on Body : गरबा खेळता ह्रदयविकाराने 10 जणांचा मृत्यू, जास्त वेळ नाचण्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
Dance Effect on Body : सध्या नवरात्री सुरु आहे. सर्वत्र दांडिया आणि रासगरबाची धूम पाहायला मिळत आहे.(Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगरबा खेळताना किंवा नाचताना तुमच्या शारीरिक मर्यादेपलीकडे नाचू नका. या गोष्टीची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा ही चूक तुमचा जीवही घेऊ शकते. (Image Source : istock)
गुजरातमध्ये गरबा खेळताना ह्रदयविकाराचा झटका येऊन 10 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुले आणि तरुणांचाही समावेश आहे.(Image Source : istock)
तुम्ही शरीराला जास्त त्रास दिला तर शरीर तुम्हाला त्रास देईल. शारीरिक मर्यादेपलीकडे नाचल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.(Image Source : istock)
जेव्हा तुम्ही खूप नाचता तेव्हा तुमच्या शरीरावर विशेषत: ह्रदयावर ताण येतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. (Image Source : istock)
नाचताना तुमचं निर्जलीकरणही होते, त्यामुळेही शरीरावर ताण येऊन आरोग्य बिघडू शकते. गरबा, डान्स किंवा जिम दरम्यान ह्रदयविकाराचा झटका येण्याचं कारण नेमकं काय, ते समजून घ्या.(Image Source : istock)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हृदय हे आपल्या शरीराचा पंप आहे, ते रक्त पंप करण्याचे काम करते.
जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा नाचतो तेव्हा आपले संपूर्ण शरीर खूप सक्रिय होते. त्यामुळे आपल्या शरीराला जास्त काम करावं लागतं.
अशा स्थितीत रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हृदयाची गतीही वाढते. यावेळी शरीराला जास्तीत जास्त ऑक्सिजनची गरज असते. त्यामुळे ह्रदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
डॉक्टर सांगतात की, मधुमेह किंवा बीपीच्या रुग्णांनी किती वेळ व्यायाम करावं हे ठरवलं पाहिजे.
तुमच्या शरीरासाठी आवश्यक तेवढाच वेळ व्यायाम करा आणि शरीराला जमेल तेवढाच वेळ नाचा. व्यायाम करताना किंवा नृत्य करताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर काळजी घ्यावी.