भाविकांनी सजली साईनगरी! चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी महोत्सव.
श्री साई पुण्यतिथी उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षीं साजरा होणाऱ्या चार दिवसीय साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
आज पहाटे काकड आरतीनंतर तदर्थ समितीचे सदस्य तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते आज पाद्य पूजा व ग्रंथ मिरवणूक पार पडली. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
श्री साई पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने दिवस विविध चार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अवघी साई नगरी सजली असून भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.(Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
आज पहाटे काकड आरती व ग्रंथ मिरवणुकीने सुरुवात झाली आहे. त्यानंतर उत्सवाचा पहिला दिवस सोमवारी काकड आरती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रीसाईसच्चरित्र अखंड पारायणाचा श्रीगणेशा, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, माध्यान्ह आरती, कीर्तन, रात्री पालखीची मिरवणूक, शेजारती असे विविध कार्यक्रम पडत आहेत. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
मुख्य दिवस मंगळवारी काकड आरती, अखंड पारायण समाप्ती, श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान, पाद्यपूजा, कीर्तन, भिक्षा झोळी कार्यक्रम, आराधना विधी, खंडोबा मंदिरात सीमोल्लंघन, रात्री रथ मिरवणूक, शेजारती, कलाकार हजेरी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.(Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सोमवार, दि. 23 ते गुरुवार 26 ऑक्टोबर या कालावधीत श्रीसाईबाबांचा 105 वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
या चार दिवसांच्या उत्सव काळात मुख्य समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. त्यामुळे भाविक भक्तांना मनोभावे दर्शन घेता येणार आहे. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
साई मंदिर परिसरातील चार नंबर प्रवेशद्वारासमोर आकर्षक असा राम मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)
यावर्षी साकारलेला राम मंदिर देखावा व प्रभू श्रीरामाची 23 फूट मूर्ती साई भक्तांसाठी आकर्षण ठरतेय. (Photo credit : shri saibaba sansthan trust shirdi/facebook)