Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवकाळी पावसाचा कापसाला फटका, दरात घसरण
पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Rain) तोंडचा घास हिरावला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यातील 28 आणि 29 नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील कापूस (cotton), तूर या पिकांना जोरदार फटका बसला.
ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे पुन्हा वेचणीला आलेला कापूस ओला झाल्यानं झाडावरच काळा पडत आहे.
हिरवेगार कापसाचे झाडाचे बोंड झाडावरच वाळत चालले आहे. त्यामुळे कापसाची प्रत घसरत चालली आहे.
हवामानामुळं कापसाची प्रत घसरली आहे. त्यामुळं बाजारात सात ते साडेसात हजार रुपये क्विंटल दराचा कापूस आता व्यापारी 6 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी करीत आहे.
एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांना रडवत आहे तर दुसरीकडे व्यापारी विक्रीसाठी नेलेला कापूस कमी दरात खरेदी करून रडवत असल्याचे चित्र आहे.
कापसाला किमान 10 हजार रुपयांचा दर मिळावा ही मागणी
काही भागात कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. कपाशीचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर वेचणी करण्यात आली
कापसाला किमान दहा हजार क्विंटल तरी भाव मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.