New Year Celebration Hangover: हँगओव्हर उतरवण्यासाठी कामी येतील हे उपाय
रात्रीच्या सेलिब्रेशननंतर अनेकांना अतिमद्य प्राशन केल्यामुळे दुसऱ्या दिवशी हँगओव्हरची तक्रार जाणवते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहँगओव्हरमुळे मळमळ होणे, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे आदी लक्षणे दिसून येतात.
हँगओव्हरमुळे वारंवार लघुशंका होणे, उलटी होणे आदी त्रास जाणवतो. त्यामुळे डिहाइड्रेशन होते. अधिक प्रमाणात पाणी प्या. याने डिहाइड्रेशनची तक्रार दूर होईल.
अति मद्यपान केल्याने तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमतरता निर्माण होते. हे पूर्ण करण्यासाठी केळी खाणे हा एक सोपा उपाय आहे. केळीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. केळी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो शिवाय एनर्जी लेव्हल वाढवण्यासही मदत करते.
हँगओव्हर उतरवण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी प्राशन करू शकता. लिंबू पाण्यामुळे तुम्हाला चांगला आराम वाटू शकतो.
हँगओव्हर असतानादेखील नाश्ता, जेवण वेळेवर करा आणि भरपूर झोप घ्या. झोप पूर्ण झाल्याने आराम वाटू शकतो.
रात्रीच्या सेलिब्रेशनमुळे हँगओव्हरचा खूपच त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.